मुख्य संपादक: सचिन गुडेटवार

शालेय पोषण आहारात बुरशी-अळ्या झालेली चॉकलेट! चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ – News18 मराठी

यवतमाळ (प्रतिनिधी : भास्कर मेहरे): विद्यार्थ्यांना यंदा पहिल्यांदाच शासनाने शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून तांदुळ न देता मिलेट न्यूट्रिशन बार रागी, ज्वार, बाजरा, अशा तीन वेगवेगळ्या प्रकारचे आहार देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने प्रत्येकी 25, असे तिन्ही मिळून प्रती विद्यार्थी 75 मिलेट बार देण्यात येणार होते. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात उन्हाळ्यात मिलेट बार दिले. तर आता तिसऱ्या टप्प्यात कॉफी रंगाच्या चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

मात्र, विद्यार्थ्यांना दिलेला पोषण आहार भलत्याच कारणाने चर्चेत असून विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पोषण आहारात चक्क तांदळाएवढ्या आकाराच्या आळ्या निघाल्या आहेत. हा प्रकार यवतमाळमधील आर्णीच्या गांधीनगर येथील श्रीमद भारती शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमधून उघडकीस आला आहे.

आर्णी शहरातील गांधीनगर येथील श्रीमद भारती शाळेत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे चॉकलेट वितरीत करण्यात आले. चॉकलेट घेऊन विद्यार्थी घरी गेले. परंतु, महालक्ष्मीनगर येथे वास्तव्यास असलेल्या इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुजफ्फर इकबाल शेख या विद्यार्थ्याने चॉकलेट घरी गेल्यानंत उघडून खाताच चॉकलेट खराब लागत असल्याचे त्याने आपल्या पालकांना सांगितले.

Satara : भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार? जयंत पाटलांनी घेतली बड्या नेत्याची भेट

त्यामुळे पालकांनी शाळेतून मिळालेल्या त्या कॉफी कलर चॉकेलेटचे पाकीट फोडून पाहणी केली असता त्या पाकिटात तांदळाएवढ्या आकाराच्या आळ्या दिसून आल्याने पालकांना धक्काच बसला. पालकांनी इतर चॉकलेट ही उघडून बघितले असता त्यात बुरशी चढुन आळ्या असल्याचे दिसून आले. सकस आहाराच्या नावावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी शिक्षण विभाग खेळत असल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link