मुख्य संपादक: सचिन गुडेटवार

यवतमाळ शहरातील शारदा चौकात मॉक ड्रिलमध्ये युवक गंभीर जखमी

यवतमाळ शहरातील शारदा चौकात मॉक ड्रिलमध्ये युवक गंभीर जखमी📢

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे युवकाच्या डोळ्याला गंभीर ईजा

 

यवतमाळ : विविध घटना व गोष्टीवर पोलीस दल पूर्व तयारी म्हणून मॉक ड्रिल करीत चाचपणी करत असतात.

यवतमाळ शहरातील शारदा चौकात केलेल्या आंदोलनाची मॉक ड्रिल चाचपणी पोलिस विभागाच्या अंगलट आली.

दंगा सदृश्य परिस्थिती घडल्यास ती नियंत्रण आणण्याची माॅकड्रिल सुरू असताना त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने अश्रू कांड्या उडविण्यात आल्या यातील एक अश्रुकांडी त्या ठिकाणी असलेल्या युवकाच्या डोळ्यात गेल्याने तो गंभीर जखमी झाला.युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता नेले मात्र जखम गंभीर असल्याने त्यांनी शहरातील संजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नेण्यास सांगितले.यानंतर संजीवनी हाॅस्पीटल येथेही प्राथमिक उपचार करून प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्या युवकाला पोलिसांनी तात्काळ नागपूर येथे पाठविण्यात आले.मात्र या गंभीर घटनेबाबत मॉक ड्रिल करताना पोलिसांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले.यामुळे त्या युवकाला आपला एक उजवा डोळा गमवावा लागते की काय असेही यावेळी दिसत आहे.या संदर्भात युवकाच्या आई-वडील व पत्नी शहर पोलीस स्टेशन येथे या संदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेण्यास शहर पोलिसांनी स्पष्ट नकार दिला व त्यांना तिथून हाकलून लावण्यात आल्याचा आरोप यावेळी युवकाच्या पत्नीने केला सदर युवक हा घरातील कमावता व्यक्ती असून त्याला आई-वडील पत्नी व तीन मुली असा त्याचा संसार आहे.या घटनेत दोषी असलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी यावी युवकांच्या नातेवाईकांनी मागणी केली आहे.