मुख्य संपादक: सचिन गुडेटवार

वैराग्यमुर्ती राष्ट्रसंत श्री गाडगेबाबांची ६८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

वैराग्यमुर्ती राष्ट्रसंत श्री गाडगेबाबांची ६८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

राष्ट्रसंत श्री.गाडगे महारांची केलेली वेशभुषा सर्वांचे लक्षवेधुन घेत होते.

पांढरकवडा तालुक्यातील पिंपरि बोरी येथे वैराग्यमुर्ती राष्ट्रसंत श्री.गाडगे महाराजांची ६८ व्या पुण्यतिथी निमित्त सर्व प्रथम पहाटे गावात स्वच्छता करण्यात आली.त्यानंतर गावात पारंपारिक पद्धतीने बैलगाडी वरती गाडगे महाराजांची प्रतिमा लावुन, महिला व पुरुष भजन मंडळीच्या सहाय्याने मिरवणुक काढण्यात आली.गाडगे महाराजांची केलेली वेशभुषा सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते.यावेळी सर्व महिलांनी पिवळी साडी परिधान केली होती.आबाल वृद्ध,पुरुष व बालांनी भगवी टोपी परिधान केली होती.मिरवणुकीची सांगता स्थानिक शिव मंदिर येथे करण्यात आला.यावेळी लहान मुलांचे झुले,फोटोचे दुकाने,खेळनीचे दुकाने तसेच इतर साहित्याचे दुकाने याठिकाणी लाण्यात आले होते जनु यात्राच भरल्याचे दृश्य याठिकाणचे होते.

त्यानंतर छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी निखिल शहाकर सर प्रमुख पाहुण्या म्हणुन पिंपरी बोरी च्या प्रथम नागरिक सौ.लावण्या गजानन गंड्रतवार,श्रीनिवास नुगूरवार,भुमया उस्केमवार,रवी पसलावार,चंदन्ना कुंटावार,साईकिरण नुगूरवार,नरसिंग तोटावार,लच्छाराम नुगूरवार,सत्यविजय करमनकर,बंडुभाऊ सिडाम हे उपसथित होते.सर्व उपस्थित मान्यवरांचे समाज बांधवा तर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच त्र्यंबक नगराळे,अमृत गंड्रतवार सर,रमेश बनपेल्ल्लीवार सर यांनी श्री संत गाडग़े महाराजांची माहिती सर्वानां सांगितली.अध्यक्षीय भाषणा मध्ये निखिल शहाकर सर यांनी श्री संत गाडगे महारांची जिवन शैली कशा पद्धतिची होती त्यांनी कशा प्रकारे समाज प्रबोधनाचे कार्य अविरत सुरु ठेवले यासंदर्भात माहिती दिली.

याप्रसंगी लहान मुले चि.नैतिक मुके,चि.आनविक कात्रजवार,कु.दिक्षा भोंग,कु.दुर्गा क्षिरसागर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमृत गड्रवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.संजिवनी मुके यांनी केले.यावेळी परिसरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.