मुंबई: मराठा आरक्षणाचा मुद्दा नेमका कधी निकाली निघणार, असा प्रश्न मराठा समाजासह सर्वांनाच पडला आहे. विधानसभेच्या आधी काहीतरी ठोस बाब समोर येईल, असं वाटत असताना आता सरकारने शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंतिम निर्णयासाठी 2025 उजाडणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
शिंदे समितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ:
मराठा आरक्षण संदर्भात गठीत केलेल्या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीला 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात या समितीची महत्वाची भुमिका असुन ही समिती उर्वरीत दस्ताऐवज जमा करणार आहे, मात्र त्यासाठी अधिकचा कालावधी लागणार असल्याचं शिंदे समितीने म्हटलं होतं.
समितीला मुदतवाढ, आरक्षण बारगळणार?
त्यानूसार राज्य सरकारने आता मुदतवाढ दिली आहे.कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात या समितीने इतर राज्यात जाऊन अभ्यास केला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, निवृत्ती न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या अध्यक्षतेखाली काम करणारी शिंदे समिती सध्या तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये काम करत आहे. त्याठिकाणी निजामकालीन दस्तऐवजांमधून मराठा आरक्षणासाठी उपयुक्त असणाऱ्या काही कुणबी नोंदी सापडतात का, यावर सध्या काम सुरू आहे. त्यामुळे एकंदरीतच मराठा आरक्षणावर कोणताही ठोस निर्णय विधानसभेपर्यंत सरकार घेणार आहे का? असा सवलाच यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्ग कोपला, भुस्खलनामुळे आतापर्यंत 93 जणांचा मृत्यू
मनोज जरांगेंची पुढे काय भूमिका?
मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस लांबणीवर पडत चालला आहे. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर सुरू केलेलं उपोषण स्थगित केलं आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगे काय भूमिका घेतात, हे महत्वाचं ठरणार आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जरांगेंनी या आधीच महायुती आणि महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. मनोज जरांगेंनी आम्ही उमेदवार पाडू, अथवा 288 उमेदवार उभी करू अशी भूमिका घेतली आहे.
दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कुणबी नोंदीचं महत्व मोठं आहे. कुणबी नोंदींच्या आधारावर सगेसोयऱ्यांना आरक्षण आणि मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण या जरांगेंच्या मागण्या आहेत. त्याला राज्यातील छगन भुजबळ. प्रकाश आंबेडकर या प्रमुख ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.